पोलीस पाटील अनंत सानप यांचे स्पष्टीकरण
सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील संभे गावामध्ये ५० कोरोना रूग्ण सापडले असल्याचे निराधार वृत्त सर्वत्र पसरल्याने एकच हाहाकार उडाला.दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील कर्तव्यदक्ष पो.पाटील अनंत सानप व तरूणवर्गाने संपूर्ण गावाची तपासणी करून खातरजमा करून सध्या गावामध्ये एकही कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याची व गावामध्ये आरोग्यदायी वातावरण असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे.
गेल्या चार दिवसांपासून संभे गावात ५० कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण सापडले असल्याचे निराधार वृत्त पसरल्याने मोठीच अफवा पसरली होती.या पसरलेल्या अफवेमुळे गावामध्येही संशयाचे व भितीदायक वातावरण पसरले होते.तर प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागला होता.
गावात कोरोना प्रादूर्भावाबाबत तशाप्रकारचा कोणताही प्रकार नसून याबाबत नाहक गावाची बदनामी होत असल्याने गावातील तरूण कार्यकर्ते रमेश सहदेव सानप, दीपेश सानप, हरेष सानप,राकेश सानप, संतोष तुपकर, नागेश सानप,डॉ.मंगेश सानप आदींच्या मदतीने प्रत्येक घरोघरी जाऊन काही प्यारा मीटर चेक करून ऑक्सीजन लेव्हल व टेपरेचर लेव्हल चेक केले असता सगळे ठिकठाक असल्याचे दिसून आले. तर या तपासणीत गावामध्ये साधी सर्दी व तापाचीही लक्षणंही कुठे आढळून आली नसल्याचे सांगतानाच शासनाकडून कोरोना काळात
पारित केलेल्या नियमावलीचेही गावात काटेकोरपणे पालन केले जात असून गावातील परिस्थितीही आरोग्यदायी व निकोप असल्याचे सांगितले.तर मागील पंधरा दिवसापूर्वी गावामध्ये चार कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळले होते.दरम्यान त्यापैकी एका रूगाची प्रक्रुती नाजुक असल्याने तो दगावल्याचे व उर्वरित तीन रूग्णांवर व्यवस्थित उपचार करून तेव्हाच घरी सोडल्याने ते सामान्य स्थितीत असल्याचे सांगतानाच गावातील सद्य परिस्थितीत गावामध्ये कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळल्याचे वृत्त निराधार असून अफवा पसरवणारे असून याकडे कोणीही लक्ष देऊ नये तर
अफवा पसरविणा-यांवर योग्य ती कारवाईची मागणी करतानाच गावाबाबत पसरलेल्या निराधार व्रुत्ताकडे कोणीही लक्ष देऊ नये अशाप्रकारचे अवाहन शेवटी पो.पाटील अनंत सानप यांनी केले.








Be First to Comment