सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हेमंत सुर्याजी ठाणगे यांची वर्णी लागली आहे.
नगरपरिषद मध्ये विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी- मनसे-शिवराय भीमराय क्रांती संघटना महाआघाडीचे मनसेचे स्विकृत नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी 12 एप्रिल 2021 रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता त्या जागी नवनिर्वाचित स्विकृत नगरसेवक नामनिर्देशित करण्यासाठी आज दि.27 एप्रिल रोजी नगरपरिषदेची विशेष सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती.
कर्जत उपविभागीय अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी वैशाली परदेशी -ठाकूर यांच्याकडे काल दि.26 एप्रिल रोजी महाआघाडीचे राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांनी हेमंत ठाणगे यांचा अर्ज सादर केला.सदरचा अर्ज छाननी करून आजच्या सभेच्या पीठासीन अधिकारी तथा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडे पाठविला.
आज दि.27 एप्रिल रोजी स्विकृत नगरसेवक यांची नियुक्ती करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी सभागृहात गटनेते शरद लाड, स्विकृत नगरसेवक पदाचे उमेदवार हेमंत ठाणगे उपस्थित होते, बाकी सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेत सहभाग घेतला. पीठासीन अधिकारी तथा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी छाननी होऊन आलेल्या हेमंत ठाणगे यांचे नाव स्विकृत नगरसेवक म्हणून जाहीर केले.








Be First to Comment