सिटी बेल लाइव्ह / रोहा #
रोहा शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील अनेक कोरोना बाधीत रूण ठेवण्यात आले आहेत. कोरोना रूग्णांकरीत उपचारा दरम्यान प्रामुख्याने गरम पाण्याची अवश्यकता असते परंतु रोहा उपजिल्हा रुग्णालयात गरम पाण्याची सोय नसल्याने अनेक दिवस रूग्णांची गैरसोय होत होती. ही चिंताजनक बाब भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या मार्फत महेश मोहीते यांना समजताच आज गरम पाण्याची सोय व्हावी या करीता इलेक्ट्रॉनिक केटल घेऊन महेश मोहीते स्वतः रुग्णालयात आले व तेथे डाॅक्टरांकडे हे इलेक्ट्रीक केटल सोपवण्यात आले. त्यामुळे रूग्णांना तत्काळ गरम पाणी मिळण्यास मदत होणार आहे .
तसेच महेश मोहीते यांनी डाॅक्टरांसोबत चर्चा करून उपजिल्हा रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या.तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या उपजिल्हा रुग्णालयातील भागांची व अमित घाग यांच्या तर्फे उभारण्यात येणार्या शेडची पाहणी केली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग , भाजपा रोहा शहर अध्यक्ष वसंत शेलार , विलास डाके व सागर ओक उपस्थितीत होते.
उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांकरीता भाजपा जिल्हा अध्यक्ष महेश मोहीते यांचा मदतीचा हात
More from रायगडMore posts in रायगड »
Be First to Comment