Press "Enter" to skip to content

प्रखर उन्हाचा तडाखा वाढू लागला : पशू पक्षीही झाले कासावीस

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

कोरोना महामारीबरोबरच दिवसेदिवस उन्हाच्या झळा अतिशय तीव्र होत चालल्याने सर्वजण हैराण परेशान झाले आहेत. तर इतर पशूपक्षीही उन्हाच्या तडाख्याने चांगलेच कासावीस झाले आहेत.

मागील कित्येक वर्षांच्या मानाने या वर्षी मात्र सर्वत्र तापमानात मोठीच वाढ झाल्याने सर्वांनाच या वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे.तर वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडणे,शितपेयांचे सेवन करणे,एसी कुलरचा वापर करणे,आहारात थंडावा निर्माण करणा-या पदार्थांचे सेवन करणे,सुती कपडे वापरणे,उन्हात फिरताना टोपी व ग्वाँगलचा वापर करणे आदी बाबींवर प्रत्येकाकडून भर दिला जात आहे.तर पशू पक्षीही दुपारच्या सुमारास झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत तसेच मनसोक्तपणे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत.

अगोदरच वाढत जाणाऱ्या कोरोना महामारीचा जनजीवनावर होत असलेल्या परिणामामुळे सर्वांचेच हालबेहाल करून सोडले आहेत.तर कोरोना महामारीचे जोडीला वाढत जाणाऱ्या तीव्र उष्णतेचाही दैनंदिन जनजीवनावरही चांगलाच परिणाम जाणवू लागल्याने स.१० ते सायं.४ वा.पर्यन्त उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत.मानवासह इतरही जीवस्रुष्टी वाढत्या तापमानवाढीमुळे चांगलेच हैराण परेशान झाले असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे.

अद्याप पावसाळा सुरू व्हायला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी त्यानंतर मात्र वा तावरणात गारवा निर्माण होईल.तोपर्यन्त प्रखर उष्णतेचा सामना हा प्रत्येकाला करावा लागेल.अशा परिस्थितीत वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रखर ऊन्हात फिरू नये,जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे,शिळेपाके अन्न खाऊ नये,पुरेशी झोप घेणे ,थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आदी नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.