Press "Enter" to skip to content

नागोठणे ग्रा.पं.सदस्य अकलाख पानसरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

नागोठणे मोहल्ल्यातील होतकरू तरुण व्यक्तिमत्व, तरुणांचे आधारस्तंभ, गरजवंतांची नेहमीच गरज भागविणारे दानशूर व्यक्तिमत्व असणारे नागोठणे ग्रामपंचायतीचे डॅशिंग विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठण्यातील युवा नेते अकलाख पानसरे उर्फ बादशाहभाई यांचा वाढदिवस रमजानच्या पवित्र महिन्यात, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून बादशाभाईंच्या कार्यकर्त्यांनी साधेपणाने साजरा केला.

बादशहाभाईंचा आज वाढदिवस असल्याचे सोशल मीडियावर कळताच वाढदिवसाच्या आदल्या रात्री १२ वाजल्यापासून ते वाढदिवसाच्या रात्री १२ वाजेपर्यंत बादशाहभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. या कोरोना महामारीच्या संकटमय परिस्थितीत देखील आपल्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल अखलाकभाई पानसरे भारावून गेल्याचे पहावयास मिळाले. यावेळी त्यांना आपले आनंदमय अश्रू रोखता आले नाही.

आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा तरुण विश्वासु कार्यकर्ता व नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सदस्य अशी ओळख असलेले अकलाखभाई पानसरे यांनी गावातील विविध अडचणी सोडविण्यासाठी बादशाह ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपमधील सदस्य कुठे काही बाका प्रसंग घडला की तेथे धावून जातात व आपल्या परीने मदत कार्य करतात. त्यामुळेच त्यांचा मोठा चाहता वर्ग मोहल्ला व परिसरात निर्माण झाल्याने ते सतत दोन वेळा ग्रामपंचायत निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन आपल्या संपूर्ण पॅनललाही त्यांनी विजयी केेेेले आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे अखलाकभाई पानसरे नक्ककीच तिस-यांदाही निवडून येऊन विजयी हॅट्रीक करण्याच्या शुभेच्छा त्यांच्या हितचिंतकांकडून रमजानच्या पवित्र महिन्यात आलेल्या वाढदिवशी त्यांना देण्यात आल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.