डोलवी येथील प्रस्तावित एमआयडीसी भूसंपादन हरकतीची तारीख पुढे ढकलावी
सिटी बेल । पेण । वार्ताहर ।
कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र सांचारबंदी सुरू आहे. त्यामुळे डोलवी प्रस्तावित एमआयडीसी साठी जमीन संपादन बाबत हरकती नोंदविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे जमीन संपादन बाबत हरकती नोंदविण्यासाठी 30 मे 2021 पर्यंत मुदत वाढवून मिळावी अशी मागणी पेण पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
पेण तालुक्यातील डोलवी एम.आय.डी.सी.साठी वावे, कोळवे, बेणेघाट, डोलवी, काराव, खारढोबी, खारचिर्बी, खारमाचेळा, खारजांभेळा, खारघाट या गावातील 2120 एकर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. या बाबत शासनाने भूसंपादन बाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या जमीन संपादन बाबत हरकती नोंदविण्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम तारीख आहे. मात्र कोविड चा वाढता प्रादुर्भावामुळे सदर हरकतीची तारीख 30 मे 2021 करावी अशी मागणी प्रदीप म्हात्रे यांनी यावेळी केली.








Be First to Comment