Press "Enter" to skip to content

पोलिसांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राजा केणी यांच्या कडून अल्पोपहाराचे वाटप

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

राज्यातील कोरोनाची स्थिती भयानक असतांना लाॅकडाऊनमध्ये नागरीकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर दिवस-रात्र झटणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसांना सामाजिक बांधिलकी जोपासत अलिबाग शिवसेना तालुकाध्यक्ष राजा केणी यांनी आज जेवणाची पाकिटे तसेच बिस्लरी पाण्याचे वाटप केले.

यावेळी अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलिस स्टेशन, पेझारी चेक पोस्ट, हाशीवरे आउट पोस्ट, सारळ चेक पोस्ट, मांडवा जेट्टी, झिराड सागरी पोलिस स्टेशन, चोंढी चेक पोस्ट, अलिबाग बायपास चेक पोस्ट, अलिबाग एसटी डेपो, जिल्हा रूग्णालय अलिबाग, जिजामाता रूग्णालय, गोधळपाडा चेक पोस्ट, कुरूल बायपास चेक पोस्ट, चौल चेक पोस्ट, रेवदंडा पोलिस स्टेशन, साळाव मुरुड चेक पोस्ट यासह अनेक ठिकाणी दुपारच्या जेवणाची पाकिटे व बिसलेरी पाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना राजा केणी म्हणाले की शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविलेल्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण यांच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी ठेऊन या भयानक विषाणूमध्ये आपल्यासाठी कर्तव्य बजावणारे पोलिस, रुग्णालयातील कर्मचारी महान असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, खारेपाट शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील, सागर पाटील, भुषण पाटील, संजय पाटील आदि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.