कर्जत नगरपरिषद, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी ठरले या आठवड्याचे मानकरी
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
माझी वसुंधरा अभियानांतर्गत संस्था, पदाधिकारी, अधिकारी उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी हे सदर सुरू करण्यात आले आहे.
या सदरा अंतर्गत दर शनिवारी व रविवारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा सन्मान करण्यात येत आहे.
या आठवडयातील शनिवारचे मानकरी ठरले आहेत, रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषद, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील.

– कर्जत शहराची पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल –
▪️शहराचे हरित अच्छादन वाढवण्यासाठी 3000 स्थानिक प्रजातींची लागवड.
▪️मागील 5 वर्षात केलेल्या 5000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड व संगोपन.
▪️शहरामध्ये घनकचरा प्रकल्प येथे सुसज्ज असे फुलपाखरू उद्यान तयार करण्यात आले आहे.
▪️सुमारे 1000 पवित्र तुळस वनस्पतींचे वाटप.
▪️ हरित पध्दतीस प्रोत्साहित करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर पॅनेल, वर्मी कंपोस्ट बेस्ड एसटीपी प्लांट असलेली “ग्रीन बिल्डिंग” बांधली गेली आहे.
▪️गरजू लोकांना मदत करण्यासाठी cloth bank- माणुसकीची भिंत संकल्पना राबविली गेली आहे.
▪️इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरामध्ये सुसज्ज असे चार्जिंग पॉईंट सुरू केले आहेत.
▪️नॉन मोटरराईज वाहनांना तसेच नो Vehicle Day ला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात सायकल रॅली आयोजित करण्यात होती.
▪️शहरातील सर्व वॉर्ड मधील विविध भागामध्ये वायु/ हवेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली.
▪️अपारंपरिक ऊर्जेचा वापरास चालना मिळावी म्हणून शहरात एकूण 3000 LED व 50 सोलार लाईट बसविले आहेत.
▪️बायोगेस प्रकल्पाद्वारे वीजनिर्मिती केली जात असून 150 LED दिवे प्रज्वलित केले जातात.
▪️पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती वापरण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
▪️इकोफ्रेंडली तलावांचा उपयोग गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी केला गेला.
▪️माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरात कलात्मक चित्रे काढून जनजागृती केली जात आहे.
▪️प्रचार प्रसिध्दीसाठी व लोकसहभाग मिळविण्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, जिंगल स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
▪️# Epledge अंतर्गत माझी वसुंधरा मित्र परिवार सदस्यांची संख्या एकूण 5,000 पेक्षा अधिक झाली आहे.








Be First to Comment