कामगारांचे कोरस इंडिया व्यवस्थापनाकडून होत असलेले शोषण थांबवा : अभिलाष डावरे यांची मागणी
सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
धाटाव औद्यगिक वसाहतीतील नामवंत अशा कोरस इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगार वर्गाचे शोषण केले जात आहे.दरम्यान याठिकाणी कामगारांकडून काम करून घेत असताना त्यांना सुरक्षिततेची कोणत्याही प्रकारची साधने पुरवली जात नसल्याने कामगार वर्गाचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सदर अशा प्रकारचे शोषण व्यवस्थापनाकडून होताना दिसत आहे.कोरसच्या व्यवस्थापनाकडून कामगारांचे शोषण थांबवा अशा आशयाचे पत्र माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियनचे प्रसिध्दी प्रमुख अभिलाष डावरे यांनी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय कामगार भवन मुंबई यांना दिले आहे.
जनरल वर्कर्स युनियनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पत्रात कंपनी कामगारांना कोणत्याही सोयी सुविधा पुरवत नसून कामगारांना सुरक्षा संबंधी सेफ्टी बेल्ट,सेफ्टी शूज,सेफ्टी जॅकेट इत्यादी वस्तू देण्यात येत नसून कामगारांना आपलं जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे म्हटले आहे.कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा विमाही उतरविलेला नसल्याने कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.सुरक्षेच्या अभावी एखादी दुर्घटना घडली तर या घटनेला कोरस व्यवस्थापन जबाबदार असेल असेही म्हटले आहे.तरी सदर प्रकाराबाबत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि न्याय मिळवून देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा पत्राद्वारे इशारा संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अभिलाष डावरे व सचिव प्रसाद मोरे यांनी दिला आहे.
दरम्यान औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय मुंबई यांच्याकडे दिलेल्या या निवेदनामुळे कोरस कंपनिबाबत संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.







Be First to Comment