Press "Enter" to skip to content

एमआयडीसी प्रकल्पाला शेतकरी अल्प मोबदल्यात जमिनी देणार नाहीत

जि.प. माजी सभापती संजय जांभळे यांचा इशारा

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील वडखळ भागातील वावे, बेणेघाट, डोलवी, शिंगणवट, गडब, खारडोंबी आदी गावांमधील जमिनी या एमआयडीसी प्रकल्पासाठी घेत असल्याने येथील शेतकरी अल्प मोबदल्यात आपल्या जमिनी देणार नाहीत असा इशारा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम माजी सभापती संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

सदर प्रकल्पाबाबत काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत मिटिंग घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की आम्ही आमच्या जमिनी कवडीमोल दराने एमआयडीसी प्रकल्प काय तर कोणत्याही उद्योगपतीला किंवा प्रोजेक्ट साठी देणार नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती करु नये अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. येथील प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र विरोधक उगाचच यांचा बाऊ करीत आहेत. संजय जांभळे यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे आणि कायम घेणार त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कोण आपला आणि कोण परका हे चांगलेच ओळखता येते त्यामुळे विरोधकांनी माझ्या बद्दल खोटा अपप्रचार करू नये असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

या भागात हा प्रकल्प येत असेल तर त्याचा मोबदला म्हणून बाधित शेतकऱ्यांना जमिनीचे दर केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे म्हणजेच मुंबई – गोवा हायवेच्या दराच्या चारपट दराने देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. बाधितांचे योग्य ते पुनर्वसन करावे
या सर्व गोष्टीं लक्षात घेता प्रशासनाने शेतकऱ्यांबरोबर बसून चर्चा करावी असेही त्यांनी सांगितले.तर आमच्या काही शेतकऱ्यांची जागा जेएसडब्ल्यू कंपनीने दोन वर्षांपूर्वी एकरी 85 लाख या दराने घेतली होती मग एमआयडीसी प्रोजेक्ट हा केंद्र शासनाचा असेल तर या दराच्या चार पटीने आमच्या शेतकऱ्यांना भाव द्यायला काय हरकत आहे. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

एमआयडीसी प्रकल्पाबाब जनसुनावणी वेळी मी शेतकऱ्यांच्या बाजूने या प्रकल्पाला विरोध केला आहे.मात्र पेण प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला मी उपस्थितीत नसल्याने विरोधकांनी संजय जांभळे हे या प्रकल्पाला मॅनेज झाले असा अपप्रचार काही येथील स्वयंघोषित नेत्यांनी सुरू केला आहे पण माझ्या कौटुंबिक कारणांमुळे त्यादिवशी येऊ शकलो नाही हे सर्वांना माहीत असतांना सुध्दा शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी संजय जांभळे हे नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आलेले आहेत आणि कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच लढणार आहेत.

संजय जांभळे — जिल्हा परिषद माजी सभापती

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.