राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्या प्रयत्नाने मोहोपाडा उपकेंद्रात कोविड-19 लसीकरण होणार सुरु !
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
महाराष्ट्र सरकारने कोव्हिशिल्ड लसीकरण सर्वत्र सुरू केलेले आहे.खालापूर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा ही सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवलपास 53000 हजारांच्या आसपास आहे.वासांबे मोहोपाडा हद्दीतील लोकसंख्या पाहता येथे कोविड-19 लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे व माजी सरपंच संदिप मुंढे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी ( डिएचओ) मोरे, आरोग्य सभापती सुधाकर घारे यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा केला.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, सरपंच ताईं पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैंदर्गींकर,वर्षा पाटील,उत्तम माली ,वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पवार,समुदाय आरोग्य अधिकारी सिएचओ अभिजित झुरे ,आरोग्यसेवक आय.पी.पानगे, आरोग्यसेवक एस.एस.म्हात्रे , आरोग्यसेवक जि.एच.भगत यांनी शनिवार दि.२५ रोजी दुपारी ३:३० वाजता मोहोपाडा आरोग्य उपकेंद्राची पाहणी करण्यात आली.

पाहणीनंतर राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून मोहोपाडा उपकेंद्रात लस उपलब्ध कधी होणार ?असा सवाल केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मोरे यांनी रविवारी कोविशिल्ड लस मोहोपाडा आरोग्य उपकेंद्रात पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.यानंतर मोहोपाडा उपकेंद्रात येत्या आठवड्यात बुधवार अथवा गुरुवारपासून लसीकरण सुरु होणार असल्याने नागरिकांनी राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे व माजी सरपंच संदिप मुंढे यांचे आभार मानले.खालापूर तालुक्यातील मोहोपाडा हे पहिले लसीकरण उपकेंद्र आहे.

दरम्यान मोहोपाडा उपकेंद्रात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंडपाची मांडणी व बसण्यासाठी खुर्चां ,डेटा आॅपरेटर,आदींची व्यवस्था वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत करणार आहे.तसेच लस घ्यायला आलेल्या नागरिकांची माहिती उपकेंद्रातील आरोग्यसेवक व एएन एम करणार आहेत.यावेली लोहोप केंद्राचे एलएचव्हि अस्मिता वाजे,एएनएम बि.बी.पाटील, प्रिया तेलगे,एम.एम.म्हात्रे,डी.बी.पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment