Press "Enter" to skip to content

रावळजे फाट्याजवळ दररोज हजारो लिटर पाणी जाते वाया

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रवाळजे फाट्याजवळ एम.आय.डी.सी ची पाईप लाईन गेली आहे. तेथे जी ‘टी’ बसवलेली आहे ती टी लिकेज असून या ‘टी’ मधून पाण्याची जणू फवारणीच होत असल्याचे दिसत आहे. यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असते.

अनेक महिन्यांपासून हा प्रकार चालू आहे.परंतु जेथे मुबलक पाणी आहे त्यांना पाण्याची किंमत कळत नाही
वाया जाणाऱ्या या पाण्याच्या पाईपची कोणी दुरुस्ती करत नसल्यामुळे दररोज अनेक लिटर पाणी जमिनीमध्ये मुरून वाया जात आहे. लिकेज पाईप अगदी रस्त्यालगत असल्यामुळे विळे-भागाड-पुणे तसेच पाली-खोपोली कडे जाण्यासाठी हा रस्ता अगदी जवळच असल्याने येथून सातत्याने अनेक वाहनांची वर्दळ असते. अनेक जण येथून ये-जा करत असतात.
मात्र कोणीही याकडे लक्ष देत नसल्यामुळे येथील पाणी वाया जात आहे.

येथील पाइपलाइनद्वारे पाणी विळे-भागाड कंपन्यांना पुरविला जातो. हा वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त केल्यास अनेकांना पाण्याचा लाभ घेता येईल. अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. पाण्यासाठी वणवण फिरावे लागते अशा परिस्थितीत पाणी वाया जाऊ देऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.