Press "Enter" to skip to content

रणरणत्या उन्हात १ मे पर्यंत रात्रंदिवस पोलिसांचा “वॉच”

महत्वाचे काम,वैद्यकीय कामासाठीच सुट,नाकाबंदी गस्त सुरुच

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वत्र युदधपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.या महायुद्धात रोह्यात वैद्यकीय कर्मचारी लढा देत आहेतच त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवस रात्र पहारा देत आहेत.रोहा,धाटाव,कोलाड पोलीस ठाणे अंतर्गत सर्वच पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी नाकाबंदी करताना दिसत आहेत.

रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्र ही विचलित होताना दिसत नाही.त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण रोहा तालुक्यात पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यात यश मिळवताना दिसत आहेत.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जाहीर झालेल्या संचारबंदीच्या काळात पोलिसांनी कुणालाही सूट न देण्याचे ठरविले आहे.मागील आठवड्या पासूनच नाकाबंदी सुरू झाली आहे.विनाकारण रस्त्यावर वाहन फिरवणाऱ्यावर कारवाई सुरू आहे.

लॉक डाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी रोह्यात जागोजागी पोलिसांची चौकी असून वाहनाची कसून चौकशी सुरु असून गस्तहि सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असल्याने संक्रमण रोखण्यासाठी नवीन नियमावली करून १ मे पर्यंत कडक लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे.रायगड विशेषतः रोह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता कडक निर्बंध जारी असताना कर्मचारी वर्गाने सध्या आपले कौटुंबिक सुख बाजूला ठेवून यावेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य वाजवण्याला अधिकाधिक महत्व दीले आहे.काही पोलीस व्यक्तिगत समस्यांपासून त्रस्त आहेत.तरीही कर्तव्यासमोर त्या गौण मानल्या आहेत.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर लवकरात लवकर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे रोहयाचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर वारंवार आवाहन करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.