Press "Enter" to skip to content

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

कोरोना आजाराने सर्व जनजीवन विस्कळित केले आहे.कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या पाहता रुग्णांना रुग्णवाहिका मिलत नसल्याने जीव जात आहेत. याकरिता पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई सदस्य डॉ. रत्नदीप गवळी यांच्या सहकार्याने व समिती अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे , सचिव डॉ. वैभव पाटील, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले.

ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांसाठी अतिशय माफक दरात ही सुविधा उपलब्ध राहणार असून कोविड 19 च्या या संक्रमण काळात पत्रकार उत्कर्ष समितीने समाजाप्रती आपल्या सेवेचा खारीचा वाटा उचलला आहे.
यावेळी उद्योगपती राजेश बी. टेलर , पटवर्धन हॉस्पिटलचा प्रशासकीय वर्ग उपस्थित होता. या सेवेचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा.

खोपोली, पेण व नवी मुंबईत ही रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आवश्यकतेनुसार 9922012359 –
7507239999 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.