सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम बनविण्यासाठी शेषराव सुर्यवंशी यांचा आदर्श वस्तुपाठ
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या उत्तम सेवेबद्दल केली लाख मोलाची मदत
सिटी बेल / पनवेल.
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी शेषराव सुर्यवंशी नुकतेच कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत.त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी देखील संक्रमित झाल्या होत्या,तूर्तास उत्तम उपचार आणि शुश्रुषा मिळाल्याने ते ठणठणीत बरे झाले आहेत.विशेष म्हणजे महागडे खासगी उपचार घेण्याची क्षमता असून देखील सुर्यवंशी दांपत्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर जो विश्वास दाखविला आहे त्या मुळे covid 19 विरोधातील या युद्धात एक आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.इतकेच नव्हे तर उपजिल्हा रुग्णालयातील उत्तम सेवेबद्दल या इस्पितळाला त्यांनी एक लाख रुपयांची मदत केली आहे.त्यांच्या या कर्तृत्वामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम बनविण्यासाठी शेषराव सुर्यवंशी यांचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
साधारण दोन आठवड्यापूर्वी सुर्यवंशी व त्यांच्या पत्नीचे RT PCR रिपोर्ट पोझीटिव आल्याने ते Covid संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले.अन्य कुठल्याही खासगी इस्पितळात दाखल होण्यापेक्षा ते दोघेही तातडीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.वैद्यकीय अधिकारी बसवराज लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली उभयतांवर उपचार सुरू होते.या दरम्यान त्यांच्या जेवणाचा डबा पनवेल करांच्या कडून जात होता.पनवेल ला सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांचे पनवेल सोबत ऋणानुबंध जुळले आहेत.
शेषराव सुर्यवंशी हे मार्च १९८३ मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून राज्य पोलिस सेवेत रुजू झाले.३६ वर्षांच्या महाराष्ट्र पोलिसांच्या अविरत आणि समर्पित सेवेनंतर जून २०१९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. या दरम्यान त्यांना चांगले अन्वेषण, शोध, कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या हाताळण्यासाठी इतर ७८३ सुयोग्य पुरस्कार आणि “चांगले तपास अधिकारी” म्हणून डीजीपी महाराष्ट्र यांज कडून विशेष सन्मान मिळाला आहे. राष्ट्रपतींचे पोलिस पदक (२०१०), डीजीपी इनसिगनिया (२००७), अखिल भारतीय पोलिस शुल्क मेळावा (२००६) मधील रौप्य पदक आणि महाराष्ट्र पोलिस मेळाव्यात (२००५) १ सुवर्ण व २ रौप्य पदके हे त्यातील लक्षवेधी पुरस्कार.
इतके मोठे अधिकारी असताना देखील ते कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार न घेता त्यांचे पनवेलरांशी जुळलेले ऋणानुबंध जपत त्यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घेण्याचे ठरवले आणि बरे होऊन जाताना त्यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयास एक लाख रुपयाची भरीव मदत केली आहे.
त्यामुळेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम बनविण्याच्या दृष्टीने सुर्यवंशी यांनी आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.शेषराव सुर्यवंशी ठणठणीत बरे होऊन पुणे येथील निवासस्थानी नुकतेच रवाना झाले.त्यांच्या ऋणानुबंध जपण्याच्या आगळ्या वेगळ्या कृत्याने पनवेल कर भारावले असून सुर्यवंशी यांच्यावर कौतुक सुमनांचा वर्षाव होत आहे.









Be First to Comment