सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कर्जत नगरपरिषदेने शहरातील बाजारपेठेतील भाजी, फळे विक्रत्यांना पोलीस मैदानावर बसविले आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने कर्जत बाजारपेठेतील सर्व पथविक्रेते, भाजीपाला, फळ विक्रेते यांना आज दि.19 एप्रिल पासून पुढील आदेश येईल तोपर्यत पोलीस मैदावावर बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.

सर्व शासकीय नियमांचे पालन करून सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या वेळात जीवनावश्यक वस्तू जसे मेडिकल, दूध विक्री, बेकरी, खाद्यपदार्थ, किराणा सामान यांची दुकाने उघडे असतील. तरी कोणीही अफवा पसरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये.जेणे करून गर्दी वाढेल. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत संचारबंदी आहे त्याचे पालन करावे, प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. मास्क लावा, वारंवार हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा. प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केलेआहे.








Be First to Comment