Press "Enter" to skip to content

कालव्याच्या दुरुस्तीसाठी टाकलेली खडी रस्त्याभर : आपघाताची शक्यता

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

कोलाड पाठबंधारे विभागाचा कारभार आहे तरी कसा कुंडलिकेच्या सिंचनातून जाणारे उजवातीर डावातीर कालवे गेली आठ ते दहा वर्षे बंदस्थितीत आहेत करोडो रुपये खर्च करून आजतागायत पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत उजवातीर कळवा काँक्रीटीकरण करण्यात आले मात्र काही अर्धवट कामांमुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे जलसंपदा खात्याने टाळले परंतु गेली महिनाभर या कालव्याची साफ सफाई करण्यास पाटबंधारे खात्याने आघाडी घेतली त्यातच पोट कालव्याच्या मोऱ्या व गेट बांधण्याचे काम ठेकेदाराने हाती घेतले परंतु या कामाकरिता टाकलेला मटरियल रहदारीच्या मार्गावर असल्याने खडी ग्रीड कोणाचाही अंकुश नसल्याने ती आता रस्त्याभर पसरत असल्याने देवकान्हे उदडवने मार्गावर अपघाताची शक्यता वर्तविली जात असून जीवावर वेतली व धोका वाढला आहे .

खांब देवकान्हे पालदाड मार्गालगत असलेला हा कालवा या मार्गावरून रात्रंदिवस नागरिकांसह वाहनांची वर्दळ सुरू असते तसेच हा मार्ग अत्यन्त अपुरा आहे एक वाहन जात असेल तर दुसरी वाहन आपघात टाळण्याकरिता उभी करावी लागते आहे परंतु सदरच्या ठेकेदाराने कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाकरिता टाकलेला मटेरियल रस्त्यावरील खडी व ग्रीट आता रस्त्याभर पसरल्याने आपघात होण्याचे चिन्ह निर्माण झाले असून सबंधीत वर्गाने याकडे लक्ष केंद्रित करून सदरच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला समज देऊन याची व्यवस्थित विल्हेवाट लावून त्यावर उपाय योजना करावी अशी मागणी केली जात आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.