Press "Enter" to skip to content

सुतारवाडी येथे श्री.काळकाई प्रसन्न व्रुद्धाश्रमाची स्थापना

सिटी बेल । कोलाड । कल्पेश पवार ।

सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुनंदा मोहिते यांच्या विशेष प्रयत्नातून सुतारवाडी येथील हायस्कूल जवळ श्री.काळकाई प्रसन्न व्रुद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली आहे.

केवल सामाजिक बांधिलकी व समाजसेवा हाच एकमेव उद्देश बाळगून सदर वुद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली असून या व्रुद्धाश्रमात अपंड,व्याधीग्रस्त तसेच बेडरेस्टवर असणारे रुग्ण यांनाही प्रवेश देणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून हे व्रुद्धाश्रम सर्व सुखसोयीईने व ऐसपैस तसेच अल्हाददायक अशा वातावरणात असल्याने याचाही फायदा गरजूंना घेता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

सदर व्रुद्धाश्रमात डाँक्टर्स,नर्स, वाँर्डबाँय,शाकाहारी व मांसाहारी भोजन आदींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.तर येथे येणाऱ्या सभासदांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा मानस कसून या आश्रमात प्रवेश घेण्यासाठी संस्धापिका सौ.सुनंदा मोहिते ९५०३४८०७४७ व हरिश्चंद्र वाजंत्री ८१४९१४७७७७ यांच्याकडे संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.