सिटी बेल । वहाळ ।
आपण समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवून वाढदिवस कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण वितेश म्हात्रे यांनी दाखवून दिले.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रक्ताचा असलेला तुटवडा लक्षात घेता वहाळ ग्रामपंचायत सदस्य तथा व्यापारी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष वितेश म्हात्रे यांनी रक्तदान शिबिराचे आज आयोजन केले होते.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे यांनी उपस्थिती दर्शवित स्वतः देखील रक्तदान केले. तसेच एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे शिरसाठ, वहाळ ग्रा. पं. चे उपसरपंच अमर म्हात्रे, ह. भ. प. महंत रामकृष्ण महाराज वहाळकर, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे अध्यक्ष शिरीष कडू, आर. के. पाटील इन्फ्रा.चे साई पाटील, रक्तदाते व मान्यवर उपस्थित होते.











Be First to Comment