सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे दि. 17 जानेवारी-2021 रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदारयादीमध्ये फोटो नसलेले मतदार, दुबार नोंद असलेले मतदार, विवाह झाल्याने स्थलांतरीत किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्थलांतरीत झालेल्या मतदारांच्या नोंदी आढळून आल्या आहेत.
कर्जत तालुक्यातीच्या मतदारांचे मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट आहे, परंतु मतदार यादीत रंगीत फोटो समाविष्ट केलेल्या नाही, अशा मतदारांनी आपला रंगीत पासपोर्ट फोटोसह नमुना नंबर-8 भरून दिनांक 20 एप्रिल 2021 पर्यंत सादर करावा. सादर केलेल्या मतदारांना ओळखपत्र देण्यात येईल ज्या मतदारांचे मतदार यादीत दुबार नाव नोंदले गेले आहे, अशा मतदारांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 18 नुसार आपलं नाव एकाच ठिकाणी मतदार यादीत ठेवण्यासाठी नमुना नंबर -7 भरुन सादर करावा तसेच ज्या मतदारांचे वय 99 वरील आहे, त्यांनी आपल्या वयात दुरुस्ती करण्याची असल्यास वया बाबतचा योग्य तो पुरावा (आधार कार्ड प्रत) जोडून नमुना नंबर -8 भरावा सदरील फार्म आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावा अथवा निवडणूक आयोगाचे NVSP.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा.
तसेच ज्या मतदारांनी नोव्हेंबर 2020 ते 2021या कालावधी मध्ये NVSP.in संकेतस्थळावर ऑनलाइन द्वारे नवीन नाव नोंदणी केलेली आहे त्यांना (E-epic) डाऊनलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्यांनी NVSP.in या संकेतस्थळावरून आपले (E-epic) डाऊनलोड करुन घ्यावेत. सदरील कामासाठी आपणास तहसीलदार कार्यालय कर्जत येथील निवडणूक शाखेत सुविधा पुरवण्यात येईल तरी संबंधित मतदारांनी याबाबत सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 189 – विधानसभा मतदारसंघ तथा तहलिसदार, कर्जत विक्रम देशमुख यांनी केले आहे.







Be First to Comment