लॉक डाऊन संचारबंदी आदेशाचे पालन करत पेण तालुक्यात दुसऱ्या आठवड्यात कडकडीत बंद
सिटी बेल । पेण । प्रशांत पोतदार ।
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊन संचारबंदी आदेशाचे पालन करत पेण तालुक्यात नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंदला पुन्हा प्रतिसाद दर्शवला असल्याचे शहरातील शुक शुकाटाने दिसून येत आहे.
नगरपालिका,प्रांत,तहसिल,वैद्यकीय विभागा बरोबर पोलिस प्रशासन पेण तालुक्यात वाढत चाललेली रुग्ण संख्या आटोक्यात आणून कोरोनाची साखळी तोडण्यास सज्ज झाले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्या पासून ते १ मे पर्यंत कडक संचारबंदि तसेच जमाबंदी आदेशाने लॉक डाऊन करण्यात आल्याने मिनी लॉक डाऊनच्या पहिल्या आठवड्या नंतर दुसऱ्या आठवड्याती शनिवारी पेण तालुक्यात लॉक डाऊन संचारबंदी आदेशाचे पालन करत कडक बंद नागरिकांना कडून पाळण्यात
आला.मेडीकल तसेच अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सोडण्यास बाजरपेठ बंद ठेवण्यात आली होती.
पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांची गस्त तसेच पोलिस बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला होता तर पेण तालुक्यात हि शुक शुकाट दिसून आला.








Be First to Comment