कोरोना रुग्णांसाठी आमदार रविशेठ पाटील यांचे निधीतून पेण येथे कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण
सिटी बेल । पेण । प्रशांत पोतदार ।
कोरोना रुग्णांना वेळेवर अद्ययावत सेवा मिळावी व त्याचे प्राण वाचावे यासाठी पेण येथे आमदार रविशेठ पाटील यांनी आमदार निधीतून २९ लाख खर्चून अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले.
यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील,उपनगराध्यक्ष वैशाली कडू, सभापती दर्शन बाफना, सभापती तेजस्विनी नेने, नगरसेवक, नगरसेविका , भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, आदी सह कर्मचारी, उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना रुग्णालयीन सुविधांची गरज लक्षात घेऊन या कॉर्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत मिळणार असून कोविड काळात रूग्णांना दिलासा मिळणार आहे. असे आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी केले. तर यावेळी बोलताना रुग्णासाठी ही अंबुलन्स संजीवनी ठरावी असे वक्त्यव्य नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केले.
पेणच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करणार
पेण शहराच्या विकासासाठी कोट्यावधींचा विकास निधी यापूर्वीच खर्च केला असून अजूनही विकास निधी खर्च करणार आहोत. पेण शहराच्या बाहेरून ५४ कोटी खर्च करून रिंग रोडची कामे सुरू आहेत, यामुळे ट्रॅफिकची समस्या सुटेल. पेण शहरात मागील वर्षभरात डांबरी रस्ते, लाईट, तलाव ,उद्याने , पाण्याचे फिल्टर प्लांट, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी समस्या सुटल्याने पेण शहराचा विकास नजरेत भरण्यासारखा झाला आहे असे आमदार रविशेठ पाटील यांनी अंबुलन्स च्या उदघाटन प्रसंगी आवाहन केले.








Be First to Comment