Press "Enter" to skip to content

सर्वहारा जनआंदोलन संघटनेला यश

कोळसा विटभट्टी मालकांनी सहा वर्षे डांबून ठेवलेल्या दहा वर्षीय मुलीची सुखरूप सुटका

सिटी बेल । गोवे -कोलाड । विश्वास निकम ।

तब्बल सहा वर्षानंतर लहानग्या मुलीची - आणि आई वडीलाांची भेट, कोळसा वीटभट्टी मालकांनी सहा वर्षे डांबून ठेवलेल्या दहा वर्षे चिमुकलीची सुखरूप मालकपासून सुटका सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे रायगड शाखेचे अध्यक्ष सोपान सुतार यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .

सदरच्या मिळालेल्या माहितीनुसार रोहा तालुक्यातील चिंचवली गारभट येथील आदिवासी मजूर तुळशिराम बाब्या पवार त्यांची पत्नी,गुलाबताई ,मुलगी कु,मनीषा आणि आई शकुंतला वडील बाब्या पवार व मामा सिताराम जाधव,असे एकाच कुटूंबातील सहाजन सहा वर्षापुर्वी, कोळसाभट्टी मालक संतोष विलास चव्‍हाण ,रा.आंबेवाडी. ता.पाथर्डी.जि. अहमदनगर यांचेकडे कोळसाभट्टीवर मजूरकामाकरीता गेले मालक संतोष चव्‍हाण यांनी या सर्वाना सांगोळा येथे कोळसाभट्टीवर काम करण्यासाठी घेतले. त्याठिकाणी या सर्वानी काम केले, मात्र मालक या लोकांना कायमस्वरूपी धंद्याकडे रहावे असे सांगत होता,मात्र या मजुरांना ते मान्य नाही,यामधे मजूर तुळशिराम म्हणाला कि आम्हाला जमणार नाही,आमचे हिशोब कर आम्ही गावी जातो,हिशोब करून यापैकी तुळशिराम बाब्या पवार,गुलाबताई,बाब्या वालक्या पवार, आणि शकुंतला बाब्या पवार यांना धंद्यातून मालक संतोष चव्‍हाण यांनी तातकाल हकलुन दिले,आणि लहान मुलगी- कुमारी- मनीषा तुळशिराम पवार आत्ताचे वय वर्षे १० हिला आणि सिताराम जाधव यांना या मालकाने स्वत:कडे डांबून ठेवले.

तेव्हापासुन तुळशिराम पवार हे आपल्या मुलीला गावी पाठवण्या करीता मालक विलास चव्‍हाण याचेकडे नेहमी दया वया विनंती करीत होते, दरम्यानच्या कालात तुळशिराम व गुलाबताई हे पोटासाठी मोलमजूरी करण्याकरीता पर जिल्ह्यात काम करीत होते,गेल्या वर्षि मनीषाची आई गुलाबताई ही स्वत: आपल्या लहानग्या मनीषाला आणण्यासाठी पुन्हा आंबेवाडी,ता,पाथर्डी येथे गेली मात्र मालक संतोष चव्‍हाण याने या मुलीला आमच्या ताब्‍यात दिली नाही,गुलाबताई ही आपल्या लहानग्या मनीषाला बघुन डोळ्यातून पाणी काढुण जड अंतकर्णाने तिथ़ुन पुन्हा माघारी फिरली.

पोटच्या पोरीला आज माझ्यापासून दुर रहावे लागत आहे हे दु:ख मनात धरून आई गुलाबताई घरी आली आणि गेल्या आठवड्यात दि,७ एप्रिल २०२१ रोजी,तुळशिराम पवार आणि गुलाबताई यांनी, सोपान सुतार – अध्यक्ष- सर्वहारा जन आंदोलन- रायगड यांची भेट घेतली व ही सर्व हकीकत सांगीतली,आणि सुतार यांनी ही सर्व माहीती समजवून घेतली व मालकाचा नांव माहिती होते परंतु फोन नंबर नसल्याने संपर्क करता आले नाही.अखेर सोपान सुतार यांनी पाथर्डी तालुक्याचे पोलीस ठाण्यात संपर्क केला व पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे साहेेब यांना दूरध्वनीद्वारे हि सर्व हकीकत सांगीतली.

त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील ठाणेअंमलदार यांना गाडी घेऊन आंबेवाडी पाथर्डी गावात पाठविले,मात्र मालक संतोष चव्‍हाण हा गेल्‍या सहा महीण्यापासून इथे रहात नाही परंतु आदिवासी समाजाची एक लहाण मुलगी त्याचेकडे आहे असे सदरच्या गावातील इतर ग्रामस्थांनी माहिती सांगितली मग सदर पोलिसांनी संतोष चव्‍हाण यांचा मोबाईल नंबर मिळवून आम्हास दिला व त्या नंबरवर आम्ही संपर्क केला असता संतोष चव्‍हाण यांनी माहिती देत सांगितले की मदगीरी जि,चित्रदुर्गा कर्नाटक येथे असल्याचे सांगीतले आणि चिमुकली मनीषा ही आमच्‍या बरोबर असल्याचे कबुल केले.

मात्र सिताराम जाधव हे माझे कडे नाहीत असे सांगीतले मात्र आम्ही संतोष चव्‍हाण यास सांगीतले की,ही मुलगी आणि सिताराम जाधव हे दोघेही चार दिवसात त्यांच्या गावी रोहा रायगड मधे घेऊन यायचे आहे जर चार दिवसात आलात नाही तर आम्ही आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत हे त्यानीही मान्य केले व सांगीतले कि साहेब मी सोमवारी संध्याकाळी पर्यंत नक्‍किच घेऊण येतो त्या प्रमाणे सोमवारी दुपारी ३ वा,पर्यंत ही मनीषा आपल्या गावी चिंचवली गारबाट येथे आपल्या आई वडीलांचे समोर उभी राहीली आणि आई बाबांचे डोळे पाण्याने भरून आले.त्यांचा आनंदी मावेनासा झाला. दोघांनीही चिमुकल्या मनिषाला मिठी मारली.

गेली सहा वर्षे कोळसा भट्टी चा मालक चव्हाण यांनी डांबून ठेवलेली चिमुकली ला तिच्या आई वडिलांपर्यत आणण्यास सर्वहारा जन आंदोलनचे रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान सुतार यांना चांगले यश आले असल्याने सर्व आदिवासी बांधवांनी त्यांना देवदूत समान मानले आहे .

अर्थातच तब्बल सहा वर्षा नंतर लहनगी मनिषा आणि आई वडील यांची भेट झाली,ही भेट आणि या मनिषाला शोधुन कोळसाभट्टी मालकाचे ताब्यातुन सोडवून आणण्यास संघटनेला यश आले असल्याचे सोपान सुतार – अध्‍यक्ष- सर्वहारा जन आंदोलन यांनी सांगितले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.