नागरिकांची कोरोना चाचणी,रेमडीसीवीर इंजेक्शन, ॲम्बुलन्स आदी खर्च करणारी खानावळे ही रायगड जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीनजीकच्या खानावळे ग्रुप ग्रामपंचायतीने “माझा कुटुंब माझी जबाबदारी”अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी कोरोना खर्च देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील व माजी उपसभापती देविदास पाटील यांच्या सहकार्याने खानावले ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतल्याचे उपसरपंच मोहन बालाराम लबडे यांनी सांगितले.
खानावळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची कोरोना चाचणी,रेमडीसीवीर इंजेक्शन, इंजेक्शन आदी खर्च करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली खानावळे ही ग्रामपंचायत आहे.
यासाठी परीसरातील नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी तपासणी खर्चांची पावती ग्रामपंचायतीकडे सादर करावी.तसेच तो कोरोना पाॅझिटीव्ह आढलल्यास त्याला हाॅस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स नेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सोय केली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेमडिसीवीर इंजेक्शनचा खर्चही ग्रामपंचायत करणार असल्याचे सरपंच जयश्री सुभाष नाईंकव उपसरपंच मोहन बालाराम लबडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.













Be First to Comment