Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते पक्षात स्वागत

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश

पनवेल (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तसेच खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

शरद कदम यांनी कबड्डी क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर तांबाटी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. सामाजिक, क्रीडा आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे ते खालापूर तालुक्यात एक सक्रिय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शरद कदम यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या क्रीडा, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील अनुभवाचा भारतीय जनता पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. समाजातील विविध घटकांना जोडण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले. रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही शरद कदम यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत त्यांच्या सहभागामुळे खालापूर तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष सन्नी यादव, हरिभाऊ जाधव, रवी पाटील, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.    

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.