सिटी बेल । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
बुध.दि.१४ एप्रिल रोजी रात्रौ.८ वाजल्यापासून शासने पुकारलेल्या लाँकडाऊनला खांब नाक्यावरील व विभागातील सर्व रहिवासी वर्गाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला आहे.तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या द्रुष्टीने येथे कडक पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिनि लाँकडाऊननंतर शासनाने अतिशय कठोर पावले ऊचलून अखेर अत्यावश्यक सेवा वगळून लाँकडाऊन पुकारला आहे.दि.१४ एप्रिल रोजी रात्रौ. ८ पासून पुकारलेला लाँकडाऊन हा पुढील पंधरा दिवसांपर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत संचारबंदी, जमावबंदी आदेशही लागू केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे अवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
खांब येथील खांब ग्रा.पंचायतीसह गोवे, ऐनवहाळ,तळवली तर्फे अष्टमी व देवकान्हे आदी ग्रा.पंचायतीचे प्रशासन व्यवस्थेनेही याबाबत ठोस निर्णय घेऊन रहिवासी वर्गामध्ये प्रबोधन केले आहे.तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या द्रुष्टीने कोलाड पो.निरिक्षक सुभाष जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली येथे चोख पोलिस बंदोबस्तासह फिरते पोलीस पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे.








Be First to Comment