Press "Enter" to skip to content

कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांच्या संकल्पनेतून आंबेडकर साजरी

कर्जतमध्ये महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अशी 130 वी जयंती साजरी

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जतमध्ये महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अशी 130 वी जयंती साजरी वंचित बहुजन आघाडी व सुमन्तु हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आणि लाॅकडाऊन असल्यामुळे आगळी वेगळी जयंती साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत, सामाजिक बांधिलकीतून 130 विदयार्थ्यांना साहित्य वाटप, संविधान प्रस्तावना वाटप, 143 जणांना मोफत चष्मे वाटप, तसेच कोरोनाच्या जैविक महामारीत संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबीरासारखा लोकोपयोगी व विधायक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर वंचित बहुजन आघाडी प्रदेश नेते दिपक मोरे, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमावेळी विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले तसेच मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच संविधान प्रस्तावनांचे वाटप दिपक मोरे, सुवर्णा जोशी, हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, अनिल गवळे, धर्मेंद्र मोरे, डॉ. सुनिल ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी सुमन्तु हॉस्पीटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, सुमन्तु हॉस्पीटलचे डॉ. सुनिल ढवळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, अनिल गवळे, तालुका सरचिटणीस प्रदीप ढोले, लोकेश यादव, राहुल गायकवाड, राजु ढोले, कमलाकर जाधव, सुनिल वाघमारे, अशोक कदम, विकी जाधव आदिनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.