द ग तटकरे कॉलेज कलंबोली येथे “विशेष रक्तदान शिबिर” : प्रत्येक रक्तदात्यांना दिले प्रमाणपत्र व ब्लड कार्ड
सिटी बेल । कळंबोली ।
सध्याच्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या संकटाने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. अश्या रुग्णांचे रक्ताअभावी जीवन संकटात आहेत.
या रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याचा उद्देशाने दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी खा. शरद पवार यांच्या आवाहनानुसार आणि प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्यध्यक्ष रविकांत वरपे, कार्यध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या सुचनेप्रमाणे रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्राचे युवा नेतृत्व पार्थदादा पवार,पालकमंत्री आदितीताई तटकरे, प्रशांत पाटील,जिल्हाध्यक्ष /नगरसेवक सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर द ग तटकरे कॉलेज कलंबोली येथे स. 10:00 ते 2:00″ या वेळेत “विशेष रक्तदान शिबिर” आयोजित केले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र व ब्लड कार्ड देण्यात आले.



या शिबिरास पनवेल महानगरपालिका जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सचिव सुरदास गोवारी, जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलाणी, आनंद भंडारी, किशोर देवधेकर, बळीराम नेटके,महेश राऊत,अमित पडवळ,युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल, युवक कार्याध्यक्ष शेहबाज पटेल, युवा नेते तुषार पाटील, किशोर साळुंखे, रणजित नरुटे, सागर पाटील, निखिल येवले, प्रदीप म्हात्रे, माणिकराव म्हमाणे,प्रशांत देशमुखे,चांद शेख,अजय डोमाकोंडा,अमर क्षिरसागर, वैभव क्षिरसागर,दिपक कदम,अभिजित बिराजदार, अक्षय खराडे,किरण आव्हाड,विशाल घाडगे,आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











Be First to Comment