सिटी बेल । गोवे कोलाड । विश्वास निकम ।
नाभिक समाजाला कोणतीही प्रकारची मदत न देता आमचा व्यवसाय बंद करुन नाभिक समाजावर अन्याय केला आहे असे मत रोहा तालुका तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रविण बाळाराम पवार यांनी व्यक्त केले आहे.
नाभिक समाज हा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक व नियमाच्या चाकोरीतून समजदरितून आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये या विचारातून चालणारा समाज आहे. शासनाने जेजे नियम लाधले आहेत त्या नियमानुसार माझ्या समाजाने काटेकोर पणे पालन केले आहे. मागील लॉकडाऊनच्या काळात शासनाने कोणतेही अर्थिक मदत न देता आमचा व्यवसाय बंद करून शासनाला एक प्रकारे सहकार्य केले होते.
या काळात सलूनचे भाडे व घरभाडे व इतर खर्च कशा प्रकारे केला असेल ? याचा विचार शासनाने केला नाही रोज कमवून खाणारा माझा समाज या कसाबसा सावरत असताना दुसरा लॉक डाऊन करून शासनाने आमची कंबर मोडली आहे असे मत प्रविण पवार यांनी व्यक्त केले आहे.
शासनाला आमची दया यावी यासाठी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष दिनेश भाई मोरे यांच्या माध्यमातून विविध मंत्री,पालक मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, यांना आमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी निवेदन दिले परंतु शासनाने आमच्या समाजाची निराशाच केली आहे. शासनाने सर्व स्थरावरील घटकांना आर्थिक मदतीची घोषणा केली. पण शासनाच्या नियमाशी प्रामाणिकपणे राहणारा आमच्या समाजाला कोणतेही मदत न केल्यामुळे आम्ही जिवन जगायचे कसे असा प्रश्न रोहा तालुका तरुण संघ नाभिक समाजाचे अध्यक्ष प्रविण पवार यांनी उपस्थित केला आहे.








Be First to Comment