Press "Enter" to skip to content

रोहा – आलिबाग रस्ता होणार सुस्साट…

रोहा – अलीबाग रस्त्याला शासनाची मंजुरी : २२९ कोटीचा निधी !

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

रोहा -अलिबाग रर-ता आता होणार आहे. राज्य शासनाने या ररत्याच्या चौपदरीकणास मंजुरी दिली आहे त्याच बरोबर पोयनाड-नागोठणे ररत्याच्या कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे. या कामाच्या निविदाही प्रसिध्द झाल्या असुन लवकरच कामाना सुरूवात होईल अशी माहिती भाजपाचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यानी दिली.

रोहा ते आलिबाग मार्गासाठी एकुण २२९ कोटी ११ लाख रूपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. ८४ किलोमीटर लांबीच्या या कामाची निविदा प्रसिध्द झाली आहे. आलिबाग ते रोहा,ते तळा आणि तळा ते साई असा हा मार्ग आहे या मार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. सिडकोचा एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प आलिबाग, मुरूड आणि रोहा तालुक्यात येणार आहे. यासाठी ४० गावामधील १९ हजार हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. या प्रस्ताविक प्रकल्पाच्या अनुषंगाने या सपुर्ण परिसरातील रस्त्याची कामे वेगाने पुर्ण केली जाणार आहेत. हा मार्ग दिघी बंदराशी जोडला जाणार आहे.

या मार्गात चार मोठे पुल, २७ छोटे पुल, २०४ मोऱ्या बांधण्यात येणार आहेत असे अॅड. महेश मोहिते यांनी यावेळी सांगितले. पोयनाड ते नागोठणे रस्त्याची मोठया प्रणाणात दुरवस्था झाली होती. या ररत्याची दुरूस्ती आणि मजबुतीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. २९ किलोमीटर लांबीच्या या कामासाठी ४२ कोटी ७४ लाख रूपयाचा खर्च अपेक्षित आहे. या कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. या मार्गावरील १ मेठा आणि ६ छोट्या पुलाचे नुतनीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.