कोरोना
बघता बघता आला आणि सगळ्यांचाच झाला.
नांव विचारले काय तर तो
‘कोरोना’ म्हणाला
नांव ऐकून आश्चर्य वाटले,म्हटलं हे कसलं नांव?
नांव!! कळलं तुझं बरं,सांग कोणतं तुझं गांव?
आगाऊपणे म्हणतो कसा चौकशा कशाला तुला.?
आता कुठे आलो आहे,स्थिरस्थावर होऊदे मला.
मी विचारले त्याला म्हणजे तु आला आहेस रहायला?
तो बोलला ठसक्यात; नाहीतर काय आलो भारत पहायला ?.
मी म्हणालो ठीक आहे बाबा, पण आधी पत्ता सांग तुझा.
म्हणतो लगेच, जन्मगांव वुहान आणि देश चीन माझा.
ठिक आहे,चिन म्हटल्यावर मला वाटलं हा राहिल किती?
चिनीच माल तो त्याला आयुष्य ते कीती?
इथेच फसलो ,खरचं फसलो आणि त्याने पसरले हातपाय.
बघता बघता जगभर पसरला जणू दे माय धरणीठाय.
सुरुवातीला वाटली नाही भिती, त्याने काय होतयं?
जो तो म्हणे
कोरोना बिरोनामुळे आपलं काय जातयं?
मग मात्र तो चेकाळला, बेभान झाला, सुसाट सुटला रोग.
जगावरती, मनुष्यजातीवर शंभर वर्षांनी आला हा महाभोग.
घश्यामध्ये चार दिवस करतो राक्षस वस्ती
फुफ्फुसाशी करत रहातो हा वेडा मस्ती.
श्वास घ्यायला होतो त्रास, बारिक ताप अन् सर्दी
कोरोना हा असा क्रुर याला आवडत नाही गर्दी.
उपाय रोगावरति शोधायला सरसावले डाॅक्टर सारे.
हातावरती सांगती मारा, सॅनिटायझरचे फवारे.
पोलिस पडले घेऊन बाहेर दंडुके,तरी थांबत नाही आमचे बाहेर पडणे.
सडकून निघाली शरिरं तरी रोजरोज तेच आमचे रडणे.
दोघांमध्ये ठेवा तुम्ही अंतर जास्तित जास्त
एकाला एक मिळतो तेव्हा रोग वाढिला वाव मस्त.
प्रसार झाला या रोगाचा भरभर पहाता पहाता.
आवरणे मग कठिण झाले, आहे त्याला आता.
अजून तरी शहाणे व्हा लाॅकडाऊनचे नियम पाळा.
आता निदान अजून त्याचा प्रसार तरी टाळा.
आता नाही केलित रोगावर मात तर सगळेच केरात मुसळ.
आपले जीवन आपल्याच हाती,नाहीतर सर्वनाश आहे अटळ.
धनंजय गद्रे. पाली







Be First to Comment