पार्थ पवार फाऊंडेशनच्या फिरत्या दवाखान्यामुळे गोरगरीबांना दिलासा
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
पार्थ पवार फाऊंडेशच्यावतीने मोफत फिरते दवाखाना सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सूरु असून गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. पार्थ पवार फाऊंडेशन मोफत फिरता दवाखाना दि,१४/०४/२१ रोजी दुपारी वासांबे मोहोपाडा येथे आले असता राजिप महिला व बाल कल्याण माजी सभापती उमा मुंढे यांनी स्वागत केले.तदनंतर डाॕ.कांचन माळवी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करून रुग्ण तपासणीस सूरुवात करण्यात आली.
या वेळी सरपंच ताई पवार , उपसरपंच राकेश खारकर ,स्वछता कमीटी अध्यक्ष अरूण गायकवाड , ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर, वर्षां पाटील, अनिल पिंगळे, संतोष पाटील, संतोष मांडे आदी उपस्थित होते. पार्थ पवार फाऊंडेशन मोफत फिरता दवाखाना डाॕ.कांचन माळवी, सहकारी शिवाजी देशमुख,परेश अपंडकर मोहम्मद खान अतिशय महत्वपुर्ण कामगिरी करत असून पार्थ पवार फाऊंडेशन मोफत फिरता दवाखाना यांच्यावतीने रुग्णानां मोफत चिकित्सा करून रक्तदाब व मधुमेह चाचणी तसेच प्रथमोपचार तसेच उत्तम सुविधा देत आहेत असे रुग्णां कडून बोलले जात आहे.


मोफत फिरता दवाखान्याकडून रुग्णांची मोफत चिकित्सा करून रक्तदाब व मधुमेह चाचणी तसेच प्रथमोपचार केले जात असून याला सामान्य नागरिकांचा चांगल्या प्रतिसाद मिळत आहे.बुधवारी दुपारनंतर मोहोपाडा परिसरात गोवोगावी फिरुन दि. १५ /०४ / २१ रोजी रिस विभाग तर १६ /०४/२१ रोजी चौक विभागात फिरता दवाखाना अनेक सामान्य नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करणार असल्याचे सांगितले.








Be First to Comment