Press "Enter" to skip to content

उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र दुसरीकडे हलवावे

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांची मागणी

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

सध्या कर्जत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे,कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात बाधित रुग्ण दाखल आहेत तसेच नियमित आरोग्य तपासणी, कोरोना चाचणी तसेच लसीकरण करण्यासाठी रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत,चुकून एखादा कोरोना बाधित रुग्ण या लसीकरण केंद्राच्या गर्दीमध्ये गेला तर मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे लसीकरण केंद्र दुसऱ्या सुरक्षित जागेत हलवावे अशी मागणी कर्जत मधील नागरिक करत होते.

याची दखल घेवून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे यांची भेट घेवून त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. डॉ. मनोज बनसोडे यांनी लसीकरण केंद्र दुसरीकडे हलवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे रुग्णालयाच्या आवारातील रिकाम्या असलेल्या परिसरात लसीकरण स्थलांतरित करण्याबाबत डॉ. बनसोडे यांनी आश्वासन दिले आहे, नगर परिषदेतर्फे साफसफाई करून देण्यात येईल, रिकाम्या जागेत मंडप टाकणे बाबत चर्चा झाली. याबाबत नगराध्यक्षा जोशी यांनी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

रुग्णालयात रेमेडीसीर इंजेक्शनचा, ऑक्सिजनचा पुरवठा बाबतची माहिती घेतली, कोरोना रुग्णांचा वार्ड फुल असल्याचे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.जनरेटर दुरुस्त झाल्याचेही डॉक्टर बनसोडे यांनी सांगितले. रुग्णालयात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगरसेवक विवेक दांडेकर यांनी पाहणी करून योग्य त्या सोयी व्हाव्यात यासंदर्भात डॉक्टरांना तसेच शल्यचिकित्सकांना एक पत्र दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.