Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र शासनाने सलून व्यावसायिकांच्या तोंडाला पाने पुसली….

सलून व्यावसायिकांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडू नका

आम्ही राज्य शासनाच्या संचारबंदीतील आदेशांचा निषेध करतो : जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे

सिटी बेल । माणगांव । प्रमोद जाधव ।

महाराष्ट्र राज्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी १३ एप्रिल च्या महत्त्वपूर्ण बैठकीत १५ जानेवारी पासून कोरोना साखळी तोडण्याकरिता राज्यात कडक संचारबंदी लागू राहणार असे निर्णय जारी केलेत मात्र,सामाजिक स्वच्छतेला जितके महत्व आहे तितकेच शारीरिक वैयक्तिक स्वछतेला देखील आहे, त्यामुळे पारंपरिक नाभिकाचा व्यवसाय करणारा नाभिक समाज हा देखील तितकाच महत्वाचा आहे.

आम्ही सलून दुकाने चालू ठेवतो तुमचे नियम पाळतो SMS (social distansing masck santizetion) हया गोष्टीचा अवलंब करतो अश्या प्रकारची निवेदने रायगड जिल्हा नाभिक समाज संघ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत व काही ठिकाणी मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील विविध प्रांताधिकारी व तहसीलदार (nodal offisar)यांना देण्यात आली होती मात्र नवीन निर्णयामध्ये सलून दुकाने बंद ठेवाच पण आम्ही तुम्हाला काही देणार नाही.

यामध्ये शासनाने नोंदणीकृत कामगार, घरेलू कामगार, रिक्षा व्यावसायिक यांना मोबदला काही प्रमाणात देऊ केला आहे,मात्र सलून व्यावसायिक यांनां कुठल्याही प्रकारची मदत राज्य शासनाकडून मिळणार नाही आणि सलून दुकाने बंद ठेवायची यामुळे रायगड जिल्ह्यातील सलून व्यवसायिकांमध्ये शासन निर्णयाच्या विरोधात नाराजी व निषेध व्यक्त केला जात आहे.

नाभिक सलून कारागीर व व्यावसायिक गेल्या वर्ष भरपासून आर्थिक दृष्ट्या विवंचनेत सापडला आहे,त्यातच नव्याने संचारबंदि व व्यवसाय ठप्प ही राज्य शासन निर्णयाने सलून व्यावसायिक व परिणामी नाभिक समाजाची क्रूर चेष्टा केली आहे या असल्या शासन निर्णयांचा आम्ही निषेध करतो..वेळ पडली तर रस्त्यावर उतरू मराठवाडा विदर्भ याठिकाणी सलून व्यावसायिकांच्या आत्महत्या होत आहेत त्याचा शासनाने विचार करावा, आम्ही कोकण व रायगड मधील बहुसंख्य सलून व्यावसायिक हे २तें व३ खुर्च्या असणारे सलून व्यावसायिक आहोत ,आमच्या पोटापुरता तरी धंदा करण्याची परवानगी द्यावी अन्यथा आम्हाला भूकबळी होऊन मरणे किंवा रस्त्यावर उतरणे असा पर्याय शिल्लक आहे तरी सरकारने सलून व्यावसायिकांसाठी भरीव मदत घ्यावी व अटी व नियमानुसार सलून दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी

दिनेश मोरे

जिल्हाध्यक्ष – रायगड जिल्हा नाभिक समाज संघ

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.