सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी राेहाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
सदर पतपेढीचा १२ वा वर्धापनदिन सोहळा कोरोना नियमावल़ीचे पालन करून माजी सचिव मुरलीधर कोंजे यांच्या खारी येथील निवासस्थानी संपन्न करण्यात आला.या वर्धापनदिन सोहळ्यास प्रारंभ करण्यापूर्वी भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष सुरेश जंगम,संचालक सुनील थिटे, शशिकांत महाडीक,मुरलीधर काेंजे व दिलीप शेळके आदी उपस्थित होते.








Be First to Comment