सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील नडवली गावचे सुपुत्र व युवा सामाजिक कार्यकर्ते तथा अष्टपैलू कबड्डीपट्टू सुमित सुशील जाधव यांची उदय व्यायाम मित्र मंडळ नडवलीचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोरोना नियमावलीचे पालन करीत मंडळाची मिटिंग गावातील हनुमान मंदिर सभागृहात संपन्न करण्यात आली. यावेळी सर्वानुमते त्यांच्या नावाची शिफारस करून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी युवानेते तथा उपसरपंच मनोज शिर्के,महेंद्र भोसले,सचिन जाधव, किशोर जाधव,अभिजित भोसले,अजय भोसले,मारुती मांडुस्कर,संदेश शिर्के, हरीश जाधव,देविदास वरखले,समीर लाडगे,अशोक शिर्के,समीर जाधव,प्रदीप भांदुर्गे,नितीन मोहिते,हेमंत वरखले,यश वरखले,राज शिर्के, अभिषेक भोसले, अक्षय शिर्के,मंगेश दळवी,प्रसाद मोकाशी,रोहन शिर्के,प्रमोद लाडगे, लक्ष्मण लाडगे,विनायक जाधव,विराज शिर्के,विवेक बामणे,भालचंद्र भांदुर्गे आदी उपस्थित होते.गावातील व खांब-कोलाड विभागात एक युवा कार्यकर्ते म्हणून नावारूपाला आलेल्या सुमित जाधव यांच्या निवडीबद्दल मंडळाचे अन्य पदाधिकारी सर्व सदस्य तसेच मुंबई व ठाणे मित्रमंडळ, ग्रामस्थ मंडळ नडवली यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment