सन २०२१ ते २४ साठी नवीन कार्यकारिणीची निवड
श्रीनिवास काजरेकर
नवीन पनवेल दि. १३ः
ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या अध्यक्षपदी दिपाली जोशी यांची निवड करण्यात आली. या संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. अध्यक्ष, सचीव आणि खजिनदार या तिन्ही महत्वाच्या पदांवर महिलांची निवड हे वैशिष्ट्य ठरले. उपाध्यक्षपदी विजय मनोहर, सचीव मंजुषा भावे, सहसचीव शामनाथ पुंडे, खजिनदार वैशाली सरदेशपांडे, सहखजिनदार आरती बोधनकर, तसेच सदस्य म्हणून मुकुंद इनामदार, विनया वाळिंबे, प्रशांत सदावर्ते, चंद्रकांत ताह्मनकर, मिलिन्द गांगल, श्रीपाद वैशंपायन, शेखर अंबेकर आदींची निवड बिनविरोध करण्यात आली.
ब्राह्मण सभा ही नवीन पनवेल परिसरात वास्तव्यास असलेल्या ब्राह्मण ज्ञातीबांधवांची संस्था असून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या कालखंडातही संस्थेच्या वतीने अनेकाना सहाय्य करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. सहयोगी पदाधिकारी सदस्य व सभासदांच्या सहकार्याने ती समर्थपणे पार पाडेन असा विश्वास मला आहे. संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी नवीन समिती सदैव प्रयत्नशील राहिल.
दिपाली जोशी
अध्यक्ष, ब्राह्मण सभा,








Be First to Comment