Press "Enter" to skip to content

केंद्रीय पथकाने केली नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी

मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या चतु:सूत्रीचे पालन करण्याचे केले आवाहन

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तसेच आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपासूनच जिल्ह्याच्या दौ-यावर असलेल्या केंद्र शासनाच्या द्विसदस्यीय पथकातील सदस्य डॉ. जी. प्रवीण यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. जिल्हा रुग्णालयातील डाॅ. समीर पोटे यावेळी त्यांच्या सोबत होते.

यावेळी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे, डाॅ. चैत्राली पवार, आरोग्य सहाय्यक मधुकर करजेकर, जिल्हा सनियंत्रण मूल्यमापन व सांख्यकी अधिकारी पुरूषोत्तम जैस्वाल
आरोग्य सहाय्यक हिरामण डोलकर, आरोग्य सेवक वंदन तांबोळी, आल्हाद पिंगळे आदींसह नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या या पथकाने कोविडच्या पार्श्वभूमीवर नागोठणे प्रा. आ. केंद्रातील सोयी-सुविधांचा तसेच करोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाकडून जे नियोजन केले जाते, त्याचाही आढावा घेतला. याशिवाय नागोठणे प्रा. आ. केंद्रांतर्गत येणारे उपकेंद्र, ऑनलाईन डेटा फिडिंग प्रणाली, उपलब्ध मनुष्यबळ या विषयीची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे यांच्याकडून जाणून घेतली. या पथकाने कोविड लसीकरणाबरोच नागोठणे प्रा. आ. केंद्रातील इतर बाबतीत सर्वोतोपरी माहिती घेऊन प्रा.आ. केंद्रातील कामकाज पध्दतीचे निरीक्षण केले.

या भेटीअंती या पथकाने कोविड- १९ च्या वाढत्या प्रादूर्भावाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, या चतु:सूत्रीचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.