Press "Enter" to skip to content

विकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी पेणमध्ये नागरीकांची तुफान गर्दी

कडक लॉक डाऊनच्या चर्चेने नागरिकांत संभ्रम

सिटी बेल । पेण । प्रशांत पोतदार ।

कोरोना विषाणूच्या पाश्वर्भूमीवर दुसरा लॉक डाऊन घेण्यात आला आहे.या मिनि लॉकडाऊन मध्ये शनिवार रविवार या विकेंड दिवशी पेण तालुक्यात तसेच शहरातील नागरिकांनी शासनाने जाहिर केलेल्या कोरोना नियमांचे पालनकरत कडकडीत बंद पाळला होता. 

परंतु शनिवार रविवार हा विकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी बाजर पेठ सुरु असल्याने पेणमध्ये नागरीकांची तुफान गर्दी झालेली दिसुन येत होती.कडक लॉक डाऊन होणार कि नाही  या बाबत नागरिकांमध्ये अजून संभ्रम असल्याने तसेच दोन दिवस पाळलेल्या बंद नंतर सोमवारी नागरिकांनी मंगळवारी गुढि पाडवा सणा निमित तसेच कडक लॉक डाऊन लागण्याच्या चर्चेमुळे बाजारपेठेत खरेदी साठी तुफान गर्दी केली होती.पेण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे दिवसाला ५०ते ७० रुग्ण संख्येचा आकडा चढता आहे.पेण उपजिल्हा रुग्णालयात तसेच केंद्रात लसीचा अद्याप तुटवडा जाणवत आहे.सरकार व पोलिस प्रशासन यांच्या कडून कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.तर नागरिकांनी हि कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.