कृषीनिष्ठ राम देवकर यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग
सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात ताज्या भाजीपाल्याच्या पिकामुळे प्रसिद्धीस आलेल्या क्रुषीनिष्ठ बाहे गावातील कृषीनिष्ठ शेतकरी राम देवकर यांनी सुर्य फुलांच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून नवा आदर्श निर्माण केला आहे. तर बहरलेली सुर्य फुलांची शेती पाहून अक्षरक्ष: येणाऱ्या जाणा-यांचे सहजच लक्ष वेधून घेत आहे.
कृषीनिष्ठ राम देवकर हे गेली अनेक वर्षे भाजीपाल्याची लागवड करून आपला आर्थिक गाडा चालवित आहेत.काळ्या मातीमध्ये सततची मेहनत करून संपूर्ण वर्षभराची रोजीरोटीही सोडवित आहेत.आपल्या वडीलोपार्जित शेतीमध्ये गेली अनेक वर्षे भाजीपाला शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचे प्रयोग करून चांगले उत्पादनही घेत आहेत.सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणा-या राम देवकर यांनी या वर्षी भाजीपाला लागवडीबरोबरच मोठ्या प्रमाणावर सूर्यफुलांची लागवड करून हा नवीन प्रयोगही यशस्वी करून दाखविला आहे. तर बहरलेली पिवळसर सोनेरी रंगांची सुर्यफुलांची शेती सहजच लक्ष वेधून घेत आहे.
याकामी त्यांची आई,पत्नी,दोन मुले व मुलगी यांचेही सहकार्य लाभत असल्याचे राम देवकर यांनी माहिती देताना सांगितले. तर या सुर्यफुलांच्या शेतीतून मिळणाऱ्या सुर्यफुलांच्या बियांचा उपयोग सुर्यफुलांचे तेल तयार करण्यासाठी करणार असल्याचे सांगतानाच हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर सुर्यफुलांची शेती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.








Be First to Comment