सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
युवक राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग यांच्या विशेष प्रयत्नातून नागोठणे केएमजी विभागात हॅन्ड फ्री सॅनिटायझर स्टॅन्ड पोस्ट सुरु करण्यात आले यावेळी मास्क वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नागोठणेचे माजी सरपंच विलास चौलकर, माजी उपसरपंच सुनिल लाड, दिनेश घाग, मधुकर चौलकर, तुकाराम खांडेकर (गुरुजी ), पांडुरंग नांदगावकर, रोहिदास हातनोलकर, सखाराम ताडकर, संतोष वादळ, नागेश सुर्वे, नामदेव पाटील, दत्तात्रय आमडोसकर, दत्तात्रय राजीवले, राकेश चितळकर, उमेर सांगडे, मिलिंद घाग, भास्कर घाग, विहार हेन्डे व के एम जी मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीच्या आजारापासून आपल्या लोकांचे संरक्षण व्हावे व सुरक्षित राहावे म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे, जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग यांनी सांगितले.








Be First to Comment