सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने कर्जत नगर परिषद हद्दीतील जुन्या छत्री केंद्रा जवळील इद्रुस व्हीला येथे असलेला ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या जागी हालविण्यात आला आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीत महावितरण कंपनी ट्रान्सफॉर्मर अडचणी ठिकाणी होते, ते अश्या ठिकाणी होते त्यामुळे तेथील नागरिकांना धोक्याचे होते, तर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दुरुती करणे धोकादायक आणि त्रासदायक होते, असे काही ट्रान्सफॉर्मर आणि चौकाच्या मध्यभागी असलेले पोल अन्य ठिकाणी हलवावेत अशी मागणी सातत्याने नागरिक करत होते तत्कालीन नगरसेविका सुवर्णा जोशी 2015 पासून याबाबत नगरपरिषद, महावितरण कंपनी कडे पाठपुरावा करत होत्या, अखेर त्याच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत हे काम प्रत्यक्ष सुरू आहे.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी महावितरण अधीक्षक अभियंता पेण मंडळ आणि उपकार्यकारी अभियंता कर्जत उपविभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करून सदर विविध कामांची तांत्रिक मंजुरी मिळवली होती, मात्र 2019-20 कोव्हिड लॉक डाऊन झाल्यामुळे पुढील कामास चालना मिळाली नव्हती, लॉक डाऊन उठल्यानंतर आता प्रत्यक्ष एक एक कामास सुरुवात झाली आहे.
जुन्या छत्री केंद्रा जवळील इद्रुस व्हीला येथे असलेला महावीर पेठेचा धोकादायक 630 केव्ही चा ट्रान्सफार्मर हलविण्याची स्थानिक नागरिकांची बरे दिवसांची मागणी होती या कामास आज शुक्रवार दि.9 एप्रिल रोजी सुरुवात झाली हा ट्रान्सफॉर्मर आता नदीच्या घाटाजवळ बसविण्यात आला आहे. त्या कामाची पाहणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे यांनी केली.
भाऊसाहेब राऊत चौकाच्या मध्यभागी असलेला पोल रहदारीस अडथळा ठरत होता तो पोल हलविण्यात आला, त्यानंतर महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळेलगत असलेला ट्रान्सफॉर्मर अन्य जागी हलविण्यात आला आहे अशी एक एक कामे मार्गी लागत आहेत, सातत्याने पाठपुरावा केल्याने ही कामे पार पडल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सांगितले.








Be First to Comment