Press "Enter" to skip to content

नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिव भोजन थाळी वाटप

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

एकीकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरी कडे कोरोनांचे संकट तर या कोरोनांच्या पाश्वभुमी अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहे.त्यातच प्रत्येकांची स्थिती उत्तमच असते असे नाही .तर काही ना दोन वेळच्या जेवणांची भ्रांत यामुळे एक दिवस का होइना त्यांच्या जेवणांचा प्रश्न मार्गी लावावा या विचारांतून वडगांव ग्रूप ग्राम पंचायत सदस्य नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून मोहपाडा येथे शिवभोजन थाळी वाटप करण्यात आले यावेळी शेकडो हून अधिक शिव भोजन थाळी देण्यात आली.

वाढदिवस म्हणजे आपल्या जिवनातील मोठा आनंदाचा दिवस,प्रत्येक जण हा दिवस मोठ्या उत्सहाने साजरा करत असतात.मात्र हा दिवस आपण कुणाच्या तरी सहवासात साजरा करावा या उद्देशाने पाटील यांनी शिव भोजन थाळी वाटप करण्याचा संकल्प केला.यावेळी शिव भोजन थाळी वाटप करतांना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर हास्य झळकत होते.कोरोना सारख्या ह्या महामारी प्रत्येकांना पोट भर अन्न मिळते असे नाही.मात्र आज वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकांची भुक मात्र शांत झाली.चे आनंद पाटील यांना मिळाले.

यावेळी माजी उपसरपंच सुरेश पाटील, मा.सरपंच अविनाश पाटील, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य हरेश पाटील, संकेत पाटील निकेतन मोधळे अदि शिवभोजन थाळी वाटप करतांना उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.