Press "Enter" to skip to content

राष्ट्वादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमिता शिंदे

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

राष्ट्वादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील राष्ट्वादी काँग्रेसच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या ४ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी राष्ट्वादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच पेण विधानसभा मतदार संघाच्या महिला निरिक्षक पदी रोहा तालुका राष्ट्वादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा सौ. अमिता राजेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आणि रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, आ. अनिकेतभाई तटकरे, महिला राष्ट्वादीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ. भावनाताई घाणेकर, रायगड जिल्हाध्यक्षा गिताताई पालरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. अमिता शिंदे यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्वादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, नंदूशेठ म्हात्रे, सुरेश मगर, नागोठणे राष्ट्वादी काँग्रेसचे विभागातील नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, शंकरराव भगत, यशवंत हळदे, कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे, पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई कोळी, पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन कळसकर, विक्रांत घासे आदींसह राष्ट्वादीचे नागोठणे विभागातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.