सिटी बेल । माणगाव । प्रमोद जाधव ।
राज्यशासनाच्या नवीन नवनविन निर्गमित झालेला लॉकडाऊन व संचारबंदी या ३० एप्रिल पर्यंत असणार आहे यामध्ये चित्रपट सिनेमागृहासोबत, सलून स्पा ब्यूटी पार्लर यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे,यामध्ये नाभिक समाज पिळवटून निघेल करिता राज्यभरात विविध नाभिक समाज संघटना, व सलून ब्युटीपार्लर असोशीयेशन यांच्या कडून राज्य सरकार व शासन निर्णयांच निषेध केला जात आहे.
नाभिक समाज हा रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात विखुरलेला आहे ,यापैकी बहुतांशी समाज बांधव व महिला भगिनी यांचे उदरनिर्वाहाचे साधन व्यवसाय सलून व ब्युटी पार्लर आहे, हेच बंद राहिल्यास त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते, व मागील लॉक डाऊन मध्ये सलून व्यावसायिकानी ज्याप्रमाणे आत्महत्येचा मार्ग निवडला याची पुनरावृत्ती होऊ शकते,कारण सलून व्यावसायिक हा हातावर रोजच्या रोज कमावून पानावर खाणारा समाज आहे.
याकरिता ३० एप्रिल पर्यंतच्या लॉक- डाऊन मधून सलून व्यवसाय वगळण्यात यावा किंवा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलून कारागिर यांकरिता वेगळे नियम लावावे जेणेकरून सलून व्यवसाय चालू राहील व कारागीर व व्यावसायिक यांच्या कुटुंबाची आर्थिक त्रेधातिरपीट थांबावी,याकरिता रायगड जिल्हा नाभिक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे व जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र जाधव यांच्या हस्ते सरकारने सलून दुकाने उघडण्याच्या अटी शर्ती मध्ये शिथिलता आणावी, व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन जे आदेश देईल ते पाळून सलून व ब्युटी-पार्लर सुरू करावे याकरिता माणगांव उपविभागीय अधिकारी(प्रांताधिकारी) प्रशाली दिघावकर-जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी माणगाव सलून व्यावसायिक चालक मालक संघटना, हुतात्मा वीर भाई कोतवाल नाभिक माणगांव चे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव,शहर अध्यक्ष किरण जाधव,बबन कडवं,अजित हुजरे,राहुल कडवं,प्रसाद शिंदे,मोहन जाधव,प्रतीक भोसले, निलेश भोसले, रुपेश भोसले आदी समाजबांधव व सलून कारागीर हजर होते.








Be First to Comment