सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
संपूर्ण देशभर कार्यरत असलेल्या ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नागोठण्यातील श्रीराम मांगले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय महासचिव राजेश आंधळे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र श्रीराम मांगले देण्यात आले आहे.
यासाठी ग्राहक-उपभोक्ता संरक्षण समितीच्या नाशिकच्या जिल्हाध्यक्ष सौ. सुचित्रा अहिरे यांच्याकडून शिफारस करण्यात करण्यात आली होती. श्रीराम मांगले यांची ही नियुक्ती ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.
“जागो ग्राहक जागो” या तत्वानुसार आपल्या गावात, शहरांत, विभागात, तालुक्यात व संपूर्ण जिल्ह्यात ग्राहक संरक्षण समितीच्या शाखा सुरु करुन कायद्याचे ज्ञान असलेले व या क्षेत्रात स्वेच्छेने काम करणारे पदाधिकारी नियुक्त करणे, समितीचे कार्य व उद्देश यांचा प्रचार करणे याविषयीचे अधिकार श्रीराम मांगले यांना या नियुक्ती पत्राद्वारे देण्यात आले आहेत. ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने आपल्या जिल्ह्यातील सर्व सरकारी, निम सरकारी, सहकारी संस्था, खासगी संस्था यांच्या ठिकाणी कायदेशीर बाबतीत नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आपल्याला कँपमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
सामाजिक कार्याची आवड असलेल्या श्रीराम मांगले यांनी यापूर्वीही अनेक महत्वाच्या पदांवर यशस्वीपणे काम केले असून सध्या ते वाहन चालक मालक सामाजिक संघाचे (कार्यक्षेत्र भारत) राष्ट्रीय कोषाध्यक्ष व अखिल भारतीय ओ बी सी संघटना रायगड जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या कार्याचीच दखल घेऊनच या नवीन महत्वाच्या पदावर त्यांची निवड केल्याचे बोलले जात असून आपल्या कार्यातून ते या नवीन पदालाही नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीबद्दल श्रीराम मांगले यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.








Be First to Comment