सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
कोकणचे भाग्यविधिते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या तसेच पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या निकटवर्तीय व निष्ठावंत असलेल्या प्रितम निशिकांत पाटील यांची रोहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खा.सुनील तटकरे यांच्या गीताबाग सुतारवाडी येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात प्रितम पाटील यांना अध्यक्षपदाचे नियुक्तीचे पत्र खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना.आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा गिता पारलेचा,प्रदेश सदस्या भावना घाणेकर,कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, जेष्ठ नेते नंदकुमार म्हात्रे,शंकर भगत,सुरेश मगर,अमिता शिंदे, शिवराम शिंदे,सुरेश महाबळे,युवा कार्यकर्ते महेंद्र पोटफोडे,राकेश शिंदे, मनोज शिर्के, संजय राजिवले,संजय मांडलुस्कर, नरेंद्र जाधव,सुधीर बारस्कर, राकेश शिंदे, निशिकांत पाटील आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे विविध कार्यक्रम व मेळावे यामध्ये पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणा-या प्रितम पाटील यांनी पक्षीयहिताला प्राधान्य देऊन काम केल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर आंबेवाडी जि.परिषद मतदार संघात त्या नेहमीच कार्यरत राहून प्रत्येकाच्या सुखदुःख प्रसंगी धाऊन जाणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व्यक्त केले जाऊ लागले आहे.








Be First to Comment