Press "Enter" to skip to content

रसायनीत मास्क न घालणा-यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणा-या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते.यातच खालापूर तालुक्यात गेल्या वर्षभरात वासांबे मोहोपाडा परिसर कोरोना संख्येत आघाडीवरच आहे.परीसरात कोरोना रोखण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत, स्वच्छता कमिटी आणि रसायनी पोलिसांनी कंबर कसली असून मास्क न घालणा-यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक धोरण स्वीकारले आहे.यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत, रसायनी पोलिस ठाणे तसेच स्वच्छता कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा बाजारपेठेतून विना मास्क फिरणा-यांवर करडी नजर ठेवून पोलिस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने सर्वांचीच पलापल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे विनामास्क फिरणा-यांवर चांगलीच जरब बसली असून रसायनी पोलिस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोहोपाडा परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

मास्क न वापरणा-या मोहोपाडा बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी व वाहनचालक यांच्यावर कारवाई करुन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येत असून कोरोनाला पलवून लावण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत,रसायनी पोलिस व स्वच्छता कमिटी यांनी कंबर कसली आहे.याचबरोबर बाजारपेठेतील दुकानदारांना मास्क,सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.