Press "Enter" to skip to content

एच.आय.एल रसायनी कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी एस. एम गायकवाड

माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड जाहीर

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनी परिसरात केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत स्थापित असलेली हिल इंडिया लिमिटेडच्या रसायनी कामगार सेनेची कार्यकारिणी निवड नुकतीच झाली असून यावेळी संघटनेच्या सरचिटणीसपदी एस. एम. गायकवाड यांची नियुक्ती, तर संघटनेच्या कार्याध्यक्षपदी रमेश पाटील यांची निवड करण्यात आली.

हिल इंडिया लिमिटेड या रसायनीतील कंपनीच्या प्रलंबित विषयाबाबत मागील महिन्यापूर्वीच रसायनी कामगार सेना या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी युनियनचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांची भेट घेतली होती. त्यावेळी अनुकंपातत्त्वावर भरती प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, कामगारांचे पी. एफ चे पैसे वेळेत भरण्यात यावेत तसेच इतर विषयांवर चर्चा केली असता तात्काळ मा.खासदार अडसुळ यांनी कंपनीचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी फोनवर संवाद साधून कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक चर्चा केली.
मा.केंद्रीय मंत्री आनंदराव अडसुळ आणि सी.एम.डी मोहंती यांच्यातील चर्चेचे महत्व ओळखून इतर कामगारांनी दिनांक 22 मार्च रोजी मोठया संख्येने रसायनी कामगार सेनेत प्रवेश केला.

त्याचवेळी रसायनी कामगार सेनेचे सरचिटणीस रमेश पाटील यांनी आपल्या संघटनेच्या वाढ आणि विकासासाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊन संघटनेच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही सुद्धा दिली.
आश्वासन दिल्याप्रमाणे रमेश पाटील यांनी आनंदराव अडसूळ यांची भेटण्याची वेळ घेऊन दिनांक 1 एप्रिल रोजी दादर येथील कार्यालयात आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत त्याजागी एस.एम गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच संघटनेच्या विकासात्मक वाटचालीसाठी संघटनेची कार्यकारिणी निवडप्रक्रिया ही अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील साळवी व रमेश पाटील आहेत. तसेच उपाध्यक्षपदी सुनील पाटील व भालचंद्र वरसोलकर असणार आहेत. पुढे सरचिटणीस एस. एम गायकवाड, संयुक्त चिटणीस रावसाहेब पाटील, ए. टी जाधव व शैलेश बर्वे असून खजिनदारपदी राहुल जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी रसायनी कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष मा. केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, रमेश पाटील, सुनील पाटील, भालचंद्र वरसोलकर, एस.एम गायकवाड, पी.पी बोहोत, जी. के कांबळे, रवी वाल्मिकी, बी.डब्लू गायकवाड, पी.व्ही जाधव, सुजित सोनावळे, भास्कर गायकवाड, आर.बी पाटील, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.