सांजरंग
कलता लोहगोल पश्चिमेस
रंग नभी उमटती
निळ्या-केशरी छटा जळावर
हलके रंग उधळती
विहग सारे येती परतुनी
घरटी पुन्हा कुजबुजती
चिमण्या पाखरा चारा देऊनी
पंख मिटुनी बसती
हात सख्याचा घेऊन हाती
स्वप्न उद्याचे कुणी रंगवती
कुणी सोनेरी क्षण आठवुनी
पुन्हा पुन्हा गाली हसती
रविबिंब ते बुडे सागरी
हुरहूर मनी दाटते
परततीच्या पावलांची नक्षी
समीर तीरी उमटते.
सौ.संध्या करंदीकर, नवीन पनवेल







Be First to Comment